पुणे -प्रतिनिधी
पुणे महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शांत झालेले रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) पुन्हा आक्रमक झाले. पत्नी व मुलाच्या पराभवाने दबावात असलेल्या धंगेकरांनी भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यावर वादग्रस्त हल्ला चढवला आहे. �वादाची सुरुवातनवी मुंबई महापालिकेसाठी सिडकोकडील भूखंड बिल्डरांना वाटप झाल्याचा आरोप करत नाईक यांनी नगरविकास खाते (एकनाथ शिंदे) व श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. “परवानगी मिळाली तर मी त्यांना माजी खासदार करेन,” असे आव्हान देत महायुतीत फूट दाखवली. (BJP minister)
धंगेकरांचा सोशल मीडिया हल्लाधंगेकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना रथावर स्वार दाखवले, तर नाईक यांचा चेहरा लावलेला कुत्रा भुंकताना दाखवला. “कुत्र्याने दगडाच्या खाणी राखाव्यात, पैसा ओरबाडावा… विकासाशी स्पर्धेची लायकी नाही,” असा मजकूर लिहिला. ही पोस्ट राजकीय वर्तुळात खळबळ माजवत आहे. श्रीकांत शिंदेंचं (Shrikant Shinde)प्रत्युत्तरश्रीकांत शिंदे म्हणाले, “वयाने विसरभोळेपणा व चिडचिडे येते,
मी डॉक्टर म्हणून सांगतोय. ठाणे-कल्याणमधून निवडणूक लढवा, मी उभा राहीन.” धंगेकरांच्या या आक्रमकतेमागे शिंदे गटात निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
