Cricket : श्रीलंकन फलंदाजाचा ‘बॅट लेप’ वाद: भारतीय बॅट्सचं कौतुक की टीका?

पुणे – प्रतिनिधी

क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचं वर्चस्व जगभर ओळखलं जातं. पण श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेंनी (34) भारतीय खेळाडूंच्या बॅट्सवर एक वादग्रस्त कमेंट केली, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.मुलाखतीत काय म्हटलं?(cricket news)
आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल स्तरावर खेळलेल्या डावखुर्‍या फलंदाज राजपक्षेंनी एका मुलाखतीत सांगितलं, “भारतीय खेळाडूंचे बॅट इतरांपेक्षा खूप चांगले वाटतात. त्यांच्यावर खास लेप आहे का काय!” हे विधान व्हायरल होताच अनेकांनी वेगवेगळे अर्थ लावले – काहींनी बॅट्स टॅम्परिंगचा संशय व्यक्त केला.वादानंतर स्पष्टीकरण:
X वर पोस्ट करत राजपक्षेंनी क्लिअर केलं, “माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला. मी भारतीय क्रिकेटचं (indian palyaer )कौतुक करत होतो! त्यांची पायाभूत सुविधा, उपकरणं आणि बॅट्स प्रगत दर्जाचे आहेत. भाषांतरात चूक झाली असावी.” त्यांनी मान्य केलं की मुद्दा better रीतीने मांडता आला असता.राजपक्षेंची कारकीर्द एक नजर:आंतरराष्ट्रीय: 5 ODI (89 रन्स), 45 T20Is (744 रन्स).आयपीएल: 2022-23 मध्ये पंजाबकडून 13 मॅचेस, 277 रन्स (SR 145+).
आक्रमक टी-20 फलंदाज म्हणून ओळख.हे विधान क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरलंय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *