पुणे -प्रतीनिधी
पौड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन बाळासाहेब शिंदे (API Sachin Balasaheb Shinde ) (वय ४५, रा. सुसगाव, मुळशी) यांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.(ACB Trap News)
शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सायंकाळी ५.४० वाजता मुळशी बीट कार्यालयात रचलेल्या सापळ्यात ही कारवाई झाली.तक्रारदाराच्या (वय ४५) विरोधात पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station )गुन्हा दाखल असून, जप्त वाहन सोडण्याच्या मोबदल्यात आणि तपासात मदत करण्यासाठी शिंदे यांनी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागितली होती.
१८ फेब्रुवारी रोजी तक्रार नोंदवली असता पडताळणीत तडजोडीने ३५ हजार रुपये ठरले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या पथकाने केली.(Crime News)
शिंदे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
