पुणे -प्रतिनिधी
वानवडीत (Wanwadi Murder) घडलेल्या या भीषण घटनेने परिसरात भीती पसरली आहे. १९ वर्षीय रुपेश शिंदे याला कबुतर चोरीच्या (Pigeon Theft ) संशयावरून ५ जणांच्या टोळक्याने पकडले आणि मध्यरात्रीनंतर पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास प्रचंड मारहाण केली.घटनेचा क्रमरुपेश आणि त्याचा मित्र अजय दुचाकीवरून हडपसरमधील शंकर मठाजवळ थांबले.(Pune Crime)
पवार एन्क्लेव्ह परिसरातील कॅनालजवळ (Hadapsar)कबुतरांच्या पिंजऱ्यांकडे गेले असता श्वानांचा भुंकण्याचा आवाज आला. “चोर… चोर…” म्हणत टोळीने त्यांचा पाठलाग केला. घाबरलेल्या रुपेशने जीव मुठीत धरून पळ काढला, पण जिनमाता मोटर्ससमोर खाली पडला. इथे टोळक्याने त्याचे हातपाय बांधले आणि बॅट, लाठा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.दवाखान्यात खोटी माहिती आणि मृत्यूमारहाण करणाऱ्यांनीच रुपेशला दवाखान्यात दाखल केले, पण ‘अपघात झाला’ अशी खोटी माहिती दिली. (Pune Police )
मित्र अजय घटनास्थळावरून पळून गेला आणि सकाळी कुटुंबीयांना सांगितले. वडिलांनी धाव घेतली, पण उशीर झाला – रुपेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पोलिस कारवाईकुटुंबीयांच्या तक्रारीवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काही आरोपींना अटक झाली असून तपास सुरू आहे. (maharashtra News)
संशयावरून निर्दयी मारहाणीमुळे परिसरात भयाचा सुळसुळाट आहे.
