Pune : वाहतूक पोलिसांना जबर वसुलीवर कडक इशारा! चालकांशी सौजन्याने वागा – अप्पर डीजीपींचे आदेश

पुणे -प्रतिनिधी

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नाराजीवरून वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस आयुक्त व अधीक्षकांसाठी परिपत्रक काढले. चालकांकडून प्रलंबित ई-चलान (EChalan Vashuli) दंड वसुलीसाठी जबरदस्ती, पैशांची अवैध मागणी किंवा उद्धट वर्तन बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.५ मार्चच्या वाहतूकदार संघटनांच्या संपात चालकांनी वाहने अनावश्यक थांबवणे, (Pratap Sarank Action)दंड जबर वसूल करणे, कागदपत्रे जप्त करण्याची धमकी देणे यावर तक्रारी मांडल्या. यानंतर सरनाईक यांनी बैठक बोलावली होती.(No Harassment Drivers)

या सूचना पालन न करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला.(Police Discipline Drive) हे वर्तन पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.(Driver Rights Maharashtra)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *