Sucide : माहेरी निघून गेलेल्या पत्नीच्या फोननंतर… पिंपरीत 23 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आयुष्य संपवलं … नेमकं काय घडलं ?

पिंपरी चिंचवड -प्रतिनिधी
चिखली परिसरात राहणारा २३ वर्षीय प्रतीक संदीप घनवटे हा तरुण पत्नीशी फोनवर झालेल्या भांडणानंतर विष प्राशन करूनाने आत्महत्या केली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.प्रतीक आणि पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक मतभेद सुरू होते. पत्नी माहेरी गेली होती.

प्रतीक तिला पुन्हा घरी आणण्यासाठी गुजरातला जाणार होता. ६ फेब्रुवारी रोजी निघण्यापूर्वी फोनवर जोरदार वाद झाला. रागाच्या भरात त्याने विष घेतले.कुटुंबीयांनी तात्काळ YCM रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, तरी प्रतीक वाचला नाही. पोलिसांनी अज्ञात वादग्रस्त व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *