Sucide : बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याने चौथ्या मजल्यावरून मारली उडी … पुण्यातील घटना

पुणे -प्रतिनिधी

पुणे वारजे परिसरात बायकोच्या छळाला वैतागून पतीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Sucide) केली. वारजे माळवाडी पोलीस (Varje Malawadi Police Station ) ठाण्यात सुनेविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास करीत आहेत.महेश दत्तात्रेय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) (Mahesh Kshirsagar) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. त्यांचे १३ वर्षांपूर्वी प्रतिभा महेश क्षीरसागर (Pratibha Kshirsagar)(वय ३५) यांच्याशी लग्न झाले होते, मात्र लग्नानंतर सतत कौटुंबिक वाद सुरू होते.

या त्रासाला कंटाळून त्यांनी २ फेब्रुवारी रोजी राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली, ज्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.महेश (Mahesh Kshirsagar) यांच्या वडिलांनी दत्तात्रेय बाबूराव क्षीरसागर (Dattatray Kshirsagar ) (वय ६८) यांनी १६ फेब्रुवारी रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार प्रतिभा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Crime ) नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्या माहेरी गेल्या होत्या, पण समजूत काढून घरी परत आल्या तरी वाद कायम होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्याप्त झाली असून, तपास सुरू आहे.(Varje Malawadi Police Station )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *