पुणे -प्रतिनिधी
बारामती (Baramati )तालुक्यातील मोरगाव चौकात मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. गजबजलेल्या चौकात अनोळखी इसमाने आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली अचानक उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखणाऱ्या चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाही, पण उशीर झाला आणि इसमाचा जागीच मृत्यू झाला.संशयास्पद वागणूक आधीच लक्षात
प्रत्यक्षदर्शींनुसार, हा इसम काही वेळापासून चौकात संशयास्पद अवस्थेत फिरत होता.(Pune Crime)
रस्त्याच्या कडेला उभा राहत, वाहनांकडे एकटक पाहत असल्याने त्याच्या अस्वस्थतेने उपस्थितांची मनात शंका निर्माण झाली होती. अचानक टेम्पोसमोर झोकून देण्याच्या क्षणी सर्वकाही घडून गेले आणि चौकात गोंधळ उडाला.पोलिस तपास वेगाने सुरू
बारामती तालुका पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह (Death Body) शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मृताच्या ओळखीचा अद्याप पत्ता लागलेला नाही, तर आत्महत्येच्या मागची कारणे काय, याचा तपास जोरदार सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, ओळख पटकरिता नागरिकांना मदत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असली तरी पोलिसांनी ती पटकन सुरळीत केली
