पुणे -प्रतिनिधी
बारामती विमानतळाजवळ (Baramati Airport) लिअरजेट ४५ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawae Accident )यांच्या निधनाला चार आठवडे पूर्ण झाल्याने वरळी एनएससीआय डोम येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित असताना अनेकांनी त्यांच्या कणखर नेतृत्वाची आणि विकासाच्या ध्यासाची आठवणी सांगितल्या.
शोकसभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली की, “दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ मान्यवरांनी हळू शब्दांत भावना व्यक्त केल्या. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता आणि जनतेशी जिव्हाळ्याची नाळ जोडणारे दादा गेले तरी त्यांची कामाची शिस्त आणि दूरदृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल.”सुनेत्रा पवार म्हणाल्या, “बारामतीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासासाठी झटणारे लोकनेते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी नव्या जोमाने कार्यरत राहावे, हीच खरी श्रद्धांजली.” शोकसभेत उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उसळले तर राज्यभरातून त्यांच्या योगदानाच्या गौरवगाथा सांगितल्या गेल्या.(Pune CIty )
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) उद्धव ठाकरे (Uddhav Thakare), रोहित पवार(Rohit Pawar) यांनी भावुक होऊन त्यांच्या आठवणी जागवल्या.
