पुणे -प्रतिनिधी
‘बॉलीवूडचे ‘हीरो नंबर १’ गोविंदा (govinda ) सध्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे स्पॉटलाइटमध्ये आहे. पत्नी सुनीता आहुजा कथित अफेअर्सवर बोलत आहेत आणि नव्या मुलाखतीत गोविंदालाही फटकारल्या!मिस मालिनीला दिलेल्या इंटरव्ह्यूत सुनीता म्हणाल्या, “माझी मुले मोठी झालीत. मी गोविंदाला सांगते, हे सर्व ऐकून ते डिस्टर्ब होतात. तुझं हे वय नाही! स्ट्रगल करणाऱ्या मुलींना खर्च भागवण्यासाठी शुगर डॅडी हवा असतो. त्यांना ना रुपयं ना चेहरा, पण हिरोईन व्हायचंय. काही फसवतात, ब्लॅकमेल करतात आणि काम काढतात.”तरुणपणात चुका ठीक, पण आता नाही! ( Sugar daddy )
सुनीता (govindas wife ) पुढे, “तू मूर्ख नाहीस! ६३ वर्षांचा आहेस, सुंदर पत्नी-मुले आहेत. तरुणपणात चुका होतात, पण या वयात नाही.” लग्नाला ३८+ वर्ष झालीत. मुलगा यशवर्धन लवकरच साजिद खानच्या ‘हंड्रेड’मध्ये डेब्यू करणार – नितांशी गोयलसोबत!
