पुणे -प्रतीनिधी
२८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यापासून महाराष्ट्र राजकारणात संशयाचे सावट गडद झाले आहे. (Rohit Pawar)अजित पवार यांचे पुतणे व राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी हा अपघात (Accident) की घातपात असा प्रश्न उपस्थित करून सरकारी तपास यंत्रणांवर (DGCA) अविश्वास दाखवला असून, आता दिल्ली दौऱ्यात खासगी गुप्तहेर संस्थांशी भेट घेऊन स्वतंत्र तपासाची चाचपणी सुरू केली आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत पत्रकार परिषद घेत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हवामान प्रतिकूल असताना टेकऑफ-लँडिंगला परवानगी, हँडलरचे ‘ओके’, वैमानिक कपूर यांच्या मानसिक स्थिती, डिलीट चॅट्स रिकवर करणे, VSR कंपनीचे नियमभंग असे मुद्दे मांडले. त्यांनी अमित शाह (Amit shah), नागरी उड्डाणमंत्री व DGCA ला पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली असून, खासगी संस्थांना माहिती देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
या घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू (Death)झाला असला तरी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी साजिशी शक्यता वर्तवली आहे. शरद पवार (Sharad Pawar ) गटातील नेत्यांनीही दुजोरा दिला असून, सोशल मीडियावरही त्यांनी DGCA च्या अहवाल विलंबावर टीका केली. यामुळे सरकारी चौकशीला पर्यायी मार्ग शोधण्याची तयारी दिसत असली तरी खासगी तपास किती परिणामकारक ठरेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
