पुणे -प्रतिनिधी
स्वारगेट (SWarget Bus Depo) येथील शिवशाही बसमधील बलात्कारप्रकरणाला मंगळवारी वर्ष पूर्ण झाले, तरी आरोपीविरुद्ध आरोप निश्चिती झालेली नाही. आरोपी दत्तात्रय गाडे(DattaTry Gade) याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन आणि पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. न्यायालयीन निकालानंतरच खटला पुढे सरकणार असल्याने पीडित तरुणी अद्याप न्यायाच्या खिळेत आहे.(Pune Crime)
प्रकरण काय?
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ५:३० ते ५:४५ दरम्यान स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये दत्तात्रय रामदास गाडे (३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोनदा बलात्कार केला. गुन्ह्यानंतर तो गावच्या शेतात लपला होता. पुणे पोलिसांनी त्याला पकडून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १२ दिवस पोलिस कोठडी सुनावली असून, नंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
आरोपपत्र व पुरावे
तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने ५२ दिवसांत ८९२ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात ८२ साक्षीदार, १२ पंचनामे आणि ५ साक्षीदारांचे जबाब समाविष्ट आहेत. ठळक पुरावे:गुन्हास्थळावरील केस व शर्टाचे बटण आरोपीचेच (रासायनिक तपासणीत सिद्ध).५ प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला पीडितेशी बोलताना पाहिले.ससून रुग्णालयाचे ३ डॉक्टरांकडून लैंगिक क्षमता सिद्ध.सीसीटीव्ही, ओळख परेड, गुगल सर्च हिस्टरी (अश्लील व्हिडिओ), ध्वनी तीव्रता तपासणी.पीडितेच्या तक्रारीवर एसटी चालक-वाहकांचे जबाब नोंदवले.पुणे न्यायालयाने आरोपीचे दोन जामीन अर्ज फेटाळले. आता उच्च न्यायालयात ॲड. वाजेद खान बीडकर (Adv Javed Khan Beedkar)यांच्या माध्यमातून अर्ज आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसार (ADV Ajay Misaar) व पीडितेचे वकील ॲड. श्रीया आवले (ADv SHreeya Aawale)यांनी विरोध केला आहे. “न्यायालयीन निकालानंतर आरोप निश्चिती होईल आणि खटला सुरू होईल,” असे मिसार म्हणाले.(Pune Crime)
