MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! सवलती मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अन्यथा पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. वाचा नियम
पुणे -प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवास सवलतींना डिजिटल वळण दिले असून, आता महिला (५० टक्के सवलत), ज्येष्ठ नागरिक (१०० टक्के सवलत), विद्यार्थी, दिव्यांगांसाठी आधार कार्ड किंवा ओळखपत्र पुरणार नाही. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नसेल तर पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने लागू झालेल्या या नियमामुळे रोखविरहित व्यवहार,…
