पुणे – प्रतिनिधी
मुंबई-बंगळुरू (Mumbai Bangalore Bypass )बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ दाट झाडीत प्रेमसंबंध (Pune Love Murder) तोडल्याच्या रागातून तरुणीचा दोरीने गळा आवळून खून करण्याची भयानक घटना उघडकीस आली. आंबेगाव पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपी तरुणाला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (KatraZ Tunnel) ही घटना १८ मार्चला घडली होती, परिसरात खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या तरुणीचे नाव मनीषा खम्म दमाई (वय २५, रा. आयुषी कॉम्प्लेक्स, पारी कंपनी चौक, नारळे) असे आहे. तर आरोपीचे नाव प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आंचम, नेपाळ) असे आहे. (AmbeGaon Police)
तक्रारदार किशन भरत परिहार (वय ३५, रा. ओमशांती बिल्डिंग, मानाजी नगर, नारळे, मूळ रा. जि. वाडा, नेपाळ) हे मनीषाचे भाऊ आहेत. तिघेही मूळचे नेपाळचे असून, पुण्यात रखवालदार म्हणून काम करतात.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार , मनीषा आणि आरोपी प्रकाश (Prakash Tikhatri) यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, प्रकाशला कोणताही स्थिर नोकरी नव्हती. यामुळे मनीषाने त्याच्याशी संबंध तोडले, ज्यामुळे प्रकाश खूप चिडला होता. १८ मार्चला प्रकाश मनीषाला नारळे भागात भेटायला आला. त्याने गोड बोलून तिला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ नेले. तेथील एका हॉटेलच्या मागील बाजूस दाट झाडी आहे. प्रकाशने मनीषाला या झाडीत नेले आणि तिच्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर त्याने दोरीने तिचा गळा आवळून खून केला आणि पसार झाला.(Pune Crime)
दरम्यान, दाट झाडीत एका तरुणी मृतावस्थेत सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते (dcp milind mohite)यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आंबेगाव पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले आणि सहायक निरीक्षक मुलाणी यांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटविली गेली. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे प्रकाशला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून खून केल्याची कबुली दिली. सध्या सहायक पोलिस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.(Murder Case)
