मोठी बातमी… ३,००० शाळांमधील शिक्षकांचा मार्चपासून पगार थांबणार; माहिती न दिल्याने .. काय आहे कारण ?

पुणे -प्रतिनिधी
महाराष्ट्रात २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांची संचमान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, अडीच हजार माध्यमिक आणि ५०० प्राथमिक शाळांनी अद्याप अनुदान प्रकार, माध्यम, पदे व पटसंख्या माहिती दिलेली नाही.शिक्षण संचालकांनी या शाळांना (School) तात्काळ माहिती देण्याचा अंतिम इशारा दिला असून, या आठवड्यात माहिती न आल्यास मार्चपासून शिक्षक (Teacher) व कर्मचाऱ्यांचा पगार थांबविला जाईल. (salaries stopped from March )

संचालनालयाने प्राथमिक व माध्यमिक-उच्च माध्यमिक विभागाकडून सर्व शाळांना पटसंख्या व अतिरिक्त-रिक्त पदांची माहिती स्कूल पोर्टलवर अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत.संचमान्यतेनंतर १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, रिक्त पद भरती व जिल्हा परिषदेच्या ६५,००० शाळांमधील बदल्या होणार आहेत. या सर्व प्रक्रिया १५ जूनपूर्वी पूर्ण होतील.माध्यमिक विभागातील १७,००० पैकी २,५०० शाळांची माहिती अपूर्ण आहे. नववी-दहावीसाठी किमान २० पटांची अट कायम असून, २० पेक्षा कमी पटाचे वर्ग व शाळा बंद होणार आहेत. न्यायालयाने हा शासन निर्णय ग्राह्य धरला असल्याने शाळांना पर्याय नाही, असे सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे (Dr. SHreeram Panjhade) यांनी सांगितले. (salaries stopped from March)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *