Pune Crime : पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर असा आडकला जाळ्यात

पुणे -प्रतिनिधी

नांदेडसिटी पोलीस स्टेशन (Nanded City Police) गुन्हा रजि. क्र. ३०१/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५, २०(ब)(२)(ब), २१ अंतर्गत फरार असलेले आर्यन विनोद पवार (Aryan Pawar)(२२, रा. दत्त मंदीराजवळ, बावधन) याला खडकवासला येथील लांडगे वस्तीतून पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत अटक केली आहे . (Absconding Accused)

< वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी बंटी मोरे, निलेश खांचे व स्वप्नील मगर यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली. पुअनि राजेश गायकवाड व इतर पथकाने ताबडतोब कारवाई करून आर्यनला पकडले. हा आरोपी चतुंगी पोस्टातील अग्निशस्त्र व बावधन पोस्टातील दुखापत गुन्ह्यांतही फरार आरोपी होता.(Khadakwasla) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यश पोलीस आयुक्त अमितेश कुमार,(Amitesh Kumar) सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त बी. राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम व सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस, पीआय प्रसाद राऊत, सहनिरीक्षक राहुल यादव व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हेगारीवर कडक कारवाईचा संकल्पआर्यन पवारवर ताब्यात घेण्याबाबत तपास निष्पन्न झाल्याने त्याच्यावरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांचा फरार गुन्हेगारांवरील शोध मोहीम यशस्वी झाल्याने गुन्हे नियंत्रणाला चालना मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *