Pramod nana bhangire जनतेच्या श्वास, विकासाचा ध्यास, प्रमोद नाना भानगिरे यांचा सेवाप्रवास

प्रिया गायकवाड

पुणे शहराच्या नकाशावर झपाट्याने वाढणारा आणि विस्तारत जाणारा भाग म्हणजे हडपसर. एकेकाळी ओसाड, गावपणाची छटा असलेला हा परिसर आज माहिती तंत्रज्ञान उद्योग, व्यावसायिक संकुलं, शैक्षणिक संस्था आणि द्रुतगतीने होणाऱ्या शहरीकरणामुळे बहुचर्चित ठरला आहे. इतक्या वेगाने बदलणाऱ्या भागाला वेळीच सक्षम नेतृत्वाची गरज होती, जे केवळ राजकारणात सक्रिय राहील असं नव्हे, तर भागाचा चेहरामोहरा बदलवण्यासाठी अथक परिश्रम घेईल. या गरजेतून उभं राहिलेलं आणि आज नागरिकांच्या मनात ठाम स्थान मिळवलेलं नाव म्हणजे प्रमोद नाना भानगिरे.Pramod nana bhangire

नानांचा प्रवास नेहमीच संघर्षांतून पुढे गेलेला आहे वयाच्या पंचविसाव्या वर्षीच त्यानी शिवसेनेच्या विभागाप्रमुखपदाची धुरा स्वीकारली आणि त्या क्षणापासूनच त्यांनी स्वतःला जनतेच्या सेवेसाठी स समर्पित केलं तरुणाईतच नेतृत्व मिळवणं ही मोठी गोष्ट असते, पण ते नेतृत्व टिकवण आणि लोकांच्या मनात स्थान ह मिळवणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे नानांनी ही दोन्ही काम कौशल्याने केली. सुरुवातीपासूनच ते कार्यकत्यांमध्ये लोकप्रिय होते, कारण ते कधीही स्वतः ला वरच्या पातळीवर समजून घेणारे नव्हते प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणी ऐकण, त्याच्या कुटुंबाशी संपर्क ठेवणं आणि त्याला वैयक्तिकरीत्या मदत करणं ही त्यांची पद्धत होती.

२००७ मध्ये त्यांना पहिल्यादा नगरसेवक म्हणून निवडून दिलं गेलं.

नगरसेवक झाल्यावर अनेक जण पदाच्या मर्यादित अडकून पडतात, पण नाना यांच्यासाठी हे पद केवळ एक जबाबदारी होतं. हडपसरमध्ये त्यावेळी पाणीटंचाई,

गटाराची वाईट अवस्था, खड्डेमय रस्ते आणि अपुरा कचरा व्यवस्थापन या समस्या गंभीर होत्या त्यांनी पदाची शपथ घेतल्यावर पहिल्याच दिवसापासून

या समस्या सोडवण्याचं ध्येय ठेवलं नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देणं, अधिकाऱ्यांना वारंवार पळवणं, बैठकीत केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष काम सुरू करून दाखवण ही त्यांची कार्यशैली होती

२००९ मध्ये ते प्रभाग समिती अध्यक्ष

झाले. या भूमिकेत त्यांनी हडपसरच्या मूलभूत सुविधांच्या उभारणीकडे लक्ष केंद्रित केलं पावसाळ्यापूर्वी गटारस स्वच्छता, उद्यानांची देखभाल, शाळांची दुरुस्ती यावर त्यांनी भर दिला. या का काळात अनेक जुन्या कामांना गती य मिळाली त्याच्या बैठकीमध्ये ते केवळ बोलण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर निर्णय तत्काळ घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यावर भर दिला.

२०११ आणि २०१७ मध्ये स्थायी समिती सदस्य झाल्यावर त्यांनी हडपसरसह पुणे शहराच्या आर्थिक नियोजनात मोलाची भूमिका बजावली. हडपसरचा विकासासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी त्यांनी नेहमी ठाम भूमिका घेतली. शहराच्या बजेट चर्चामध्ये त्यांनी नेहमी नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य दिलं. आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि पायाभूत सुविधा यासाठी त्यांनी सातत्याने निधी मंजूर करून घेतला.

त्यांच्या नेतृत्वाखाली हडपसरचा चेहरामोहरा बदलला. श्रीराम चौक हा भागाचा ओळख निर्माण करणारा केंद्रबिंदू ठरला. महात्मा फुले जलतरण तलावामुळे पोहण्यासारख्या खेळाला चालना मिळाली. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल ग्राउंड, गोपीनाथ मुंडे उद्यान आणि धम्मवीर आनंद दिघे गार्डन यामुळे युवक आणि मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदाने उपलब्ध झाली. नवनवीन रस्त्यांचं डांबरीकरण, रुंदीकरण, गटार लाईन्सचा विस्तार, पाणीटाक्यांची उभारणी, सार्वजनिक वाचनालयं, शाळांचं नूतनीकरण, या सर्वांनी हडपसरचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला.

त्यांच्या विकासकामांइतकीच महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची सामाजिक बांधिलकी. महिलांसाठी आरोग्य शिबिरं, बचतगटाना प्रोत्साहन, कौशल्य विकास उपक्रम या त्यांच्या कामांमुळे महिलांना नवी दिशा मिळाली विद्याथ्यर्थ्यांसाठी शालेय साहित्य वितरण, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांसाठी मदत आणि मोफत वर्ग यामुळे तरुणाईला संधी मिळाली वृद्धांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांसाठी क्रीडा
साहित्य आणि रोजगार मेळावे या त्यांच्या उपक्रमांमुळे समाजातील प्रत्येक घटक त्यांच्याशी जोडला गेला

२०२० मध्ये कोरोनाकाळ सुरू झाला, तेव्हा संपूर्ण जग हादरलं. हडपसरमध्ये हजारो कुटुंबं संकटात सापडली. रुग्णालयात बेड मिळणं अवघड झालं, ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता होती, अन्नधान्याचा प्रश्न उभा राहिला. त्या वेळी नाना स्वतः नागरिकांच्या म दतीसाठी धावले. त्यांनी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून दिले, ऑक्सिजन पुरवठा केला, औषधं पोचवली आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप केलं. अनेकांना तो काळ आजही आठवतो आणि ते म्हणतात त्या कठीण काळात जर नाना नसते, तर आम्ही वाचलो नसतो.

२०२२ मध्ये त्यांना शिवसेना पुणे शहरप्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. या भूमिकेत त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच शहराच्या प्रश्नांवर आक्रम क भूमिका घेतली. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण, रस्त्यांची कामं या विषयांवर त्यांनी सतत आवाज उठवला. त्याचबरोबर २०२३ मध्ये त्यांनी ‘एकनाथ शिंदे फाउंडेशन’ची स्थापना केली. या फाउंडेशनने आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि आपत्ती मदत अशा क्षेत्रांमध्ये मोठं काम केलं कोविडनंतर आरोग्य तपासणी शिबिर,

कामाची दखल घेत एबीपी माझा चॅनेलने त्यांना ‘अनमोल रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केल मोफत औषध वितरण, अनाथ मुलांसाठी शैक्षणिक मदत या उपक्रमांमुळे फाउंडेशन लोकांच्या मनात घर करून बसलं या कामाची दखल घेत एबीपी माझा चैनल नाही त्यांना अनमोल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं

नानांच्या कार्यशैलीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जनतेशी असलेला संवाद ते स्वतः नागरिकांशी भेटतात त्यांच्या घरी जातात त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात नेता आणि नागरिक यांच्यातला दुवा त्यांनी कधीच निर्माण होऊ दिला नाही म्हणूनच आज हडपसर मध्ये प्रतीक कुटुंब त्यांना नेता म्हणून नव्हे तर आपला माणूस म्हणून पाहत

आज हडपसर झपाट्याने वाढत आहे पुढच्या काळात वाहतुकीची कोंडी पाणीपुरवठा शिक्षण आणि आरोग्य या समस्या अधिक तीव्र होणार आहेत नाना यांचे भान ठेवून दीर्घकाली नियोजनावर भर देत आहेत त्यांचा दृष्टिकोन स्वच्छ हरित आणि सुसज्ज हडपसर घडवण्याचा आहे स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पायाभूत सुविधा डिजिटल सुविधा आधुनिक आरोग्य केंद्र युवकांसाठी रोजगार निर्मिती ही त्यांची उद्दिष्ट आहेत .

प्रमोद नाना भानगिरे यांचा प्रभास हा केवळ पदाचा प्रवास नाही तो संघर्षाचा सेवाभावाचा आणि जनतेच्या विश्वासाचा प्रवास आहे त्यांनी केलेली विकास काम आज हडपसरच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसतात त्यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमाची आठवण प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे म्हणूनच जनता त्यांना नेता म्हणत नाही तर आपला माणूस म्हणते हडपसरचा चेहरा बदलणाऱ्या यांनी त्याचा प्रवास अजून सुरू आहे जनतेच्या विश्वासाचा आधार आणि त्यांच्या सेवाभावाची ताकद घेऊन हा प्रवास पुढेही नवनवीन शिखर गाठे यात शंका नाही हडपसरच्या आजच्या आणि उद्याच्या पिढीमध्ये त्यांच्या कामाचा ठसा कायम राहील आणि त्यांच्या नावाशी जोडलेला जनतेचा विश्वास कधीही कमी होणार नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *