Accident …भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला सीएनजी पंपसमोर कारने उडवलं : गंभीर जखमी

पुणे -प्रतिनिधी
पुणे शहरातील आरटीओ चौकाजवळील सीएनजी पंपासमोर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला (bjp shahjaad punawala) यांच्या ७५ वर्षीय आई यास्मीन यांना कारने धडक देऊन गंभीर जखमी झाल्या आहेत . पाय आणि पाठीला फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बंडगार्डन पोलिसांनी कारचालक हेमंत रविंद्र चांदगुडे (४०, चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे.सीएनजी भरण्याच्या वेळी अपघातशहजाद पूनावाला यांच्या आई आणि नातेवाईकांना ठाणे येथून कामासाठी पुण्यात आले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरटीओ चौकातील सीएनजी पंपवर कार भरण्यासाठी गेले.(aident )

चालक सीएनजी भरण्यास गेल्यावर यास्मीन पंपासमोर उभ्या होत्या. त्याचवेळी चांदगुडे आपली कार पाठीमागे घेत होते. लक्ष न देता निष्काळजीने धडक देऊन यास्मीन खाली पडल्या. अपघातानंतर चांदगुडे रुग्णालयात न नेऊन पळून गेला. नागरिक आणि चालकाने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी पाय आणि पाठीला फ्रॅक्चर निदान केले. प्रकृती स्थिर आहे.तक्रार, तपास सुरूशहजादांचे मॅनेजर केविन प्रफुल्ल वजीर (३८) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चांदगुडेचा शोध सुरू आहे. शहरात अशा निष्काळजी अपघात रोखण्यासाठी सतर्कता बरघास्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *