पुणे -प्रतिनिधी
बांग्लादेशच्या हकालपट्टीनंतर ICC ला धमकीमोहसिन नक्वींची पंतप्रधान शरिफांशी महत्त्वाची बैठकपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी आज सायंकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरिफ यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत घेतलेला निर्णय पाकिस्तान क्रिकेट संघाला मान्य करावा लागेल, असे नक्वी यांनी स्पष्ट केले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या समर्थनार्थ PCB आता पूर्ण T20 वर्ल्ड कपऐवजी फक्त भारताविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रित करत आहे.भारताविरुद्ध कोलंबो लढतीवर बहिष्काराची धमकGeo News च्या वृत्तानुसार, PCB भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे. या सामन्याला जगभरात प्रचंड मागणी आहे,(cricket )
याची PCB ला जाण आहे. मात्र, सामन्यातून मिळणारा महसूल वाटा PCB लाच मिळणार असल्याने हा निर्णय त्यांच्याच नुकसानकारक ठरू शकतो.दोन गुण गमावून स्पर्धेत मागे पडण्याची शक्यताभारताविरुद्ध सामना न खेळल्यास पाकिस्तानला दोन गुण गमावावे लागतील, ज्याचा थेट फटका स्पर्धेच्या पुढील टप्प्यात बसू शकतो.
अ ग्रुपमध्ये भारत (india), पाकिस्तानसह अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स आहेत; यातून फक्त दोन संघ पुढे जातील. PCB चा हा हट्ट त्यांनाच महागात पडण्याची शक्यता जास्त आहे.बांग्लादेश समर्थनासाठी PCB चे तीन पर्याय समोरबांग्लादेशच्या हकालपट्टीनंतर PCB ने निषेध म्हणून तीन पर्याय मांडले आहेत:पहिला पर्याय: वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामन्यांत खेळाडूंच्या दंडावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवणे.दुसरा पर्याय: १५ फेब्रुवारीला भारताविरुद्धच्या लढतीवर पूर्ण बहिष्कार.तिसरा पर्याय: स्पर्धेतील सर्व विजय बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या समर्थनासाठी समर्पित करणे.या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) दबाव वाढला असून, T20 वर्ल्ड कपची उत्सुकता धूसर झाली आहे
