पुणे – प्रतिनिधी
२८ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar death) यांचं विमान अपघातात निधन झालं. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, अपघात की घातपात यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.दिवंगत नेत्यांच्या स्मारक आणि संग्रहालयाच्या ठिकाणावर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी चर्चा करत आहेत. यासंदर्भात पार्थ पवार (Parth Pawar) व जय पवार (Jay Pawar ) यांच्यात मतभेद असल्याची काही माध्यमांमध्ये बातमी आली होती. मात्र, दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याची स्पष्टता आली आहे. ते सर्व बैठकींना एकत्र हजेरी लावत असून, जय पवार यांनी पार्थ पवार यांना सोबत घेऊन बैठका घेतल्या आहेत.
याचे व्हिडीओही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.मंगळवारी (१० फेब्रुवारी) जय पवार यांनी मंत्रालयात सुनेत्रा पवार (sunetra Pawar )यांच्या दालनात पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांचं संग्रहालय पुणे शहरात बांधावं, ही इच्छा व्यक्त केली. पुणे जिल्हा व शहरावर अजित पवार यांचं प्रचंड प्रेम होतं; तिथे त्यांचं योगदान मोठं आहे, असं त्यांनी सांगितलं.दरम्यान, पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या भूमिकेबाबत काही माध्यमांनी बारामतीला प्राधान्य देण्याचा आग्रह असल्याची बातमी दिली. मात्र, यात तथ्य नसल्याचं पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जात आहे. पार्थ व जय दोघेही एकजुटीने पक्षकार्य करत आहेत.(Baramati)
