Bhigwan : 22 तारखेला तरुणीचे लग्न .. नवरदेव अधिकारी तरीही उच्चशिक्षित तरुणी गुन्हेगारासोबत का पळून गेली… ? पडळकर स्पष्टच म्हणाले

पुणे -प्रतीनिधी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी २१ वर्षीय सुशिक्षित तरुणीचे कथित अपहरण झाल्याची बातमी राज्यभर पसरली. आई-भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवर घरी परतताना जहीर शेख व आयान शेख या भावांनी मिरचीपूड टाकून मारहाण करत टेम्पोमध्ये नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी भिगवण पोलीस ठाण्यात नोंदवला.(Pune Crime)
तरुणीने मात्र बारामती पोलीस ठाण्यात हजर होऊन स्वमर्जीने निघाल्याचे सांगितले असले तरी नातेवाईकांनी हा दावा फेटाळला. एमपीएससी उत्तीर्ण अधिकाऱ्याच्या मुलीचे २२ तारखेला लग्न ठरले असताना डी.फार्मसी पदवीधर ती गुन्हेगारासोबत का पळेल, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. नातेवाईकांनी धाक दाखवून बोलायला लावल्याचा आरोप करत आत्महत्येचा इशारा दिला आहे.मोठे षडयंत्राचा संशयपडळकर यांनी इंदापूर तालुक्यात २५ मुलींची अशी प्रकरणे असल्याचा दावा करत वडील नसलेल्या किंवा मालमत्ताधारक मुलींना टार्गेट करून व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगितले. (Crime News)
गंभीर गुन्हे दाखल असलेला अझहर हतबल या मुख्य सूत्रधाराने हे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला असून, शेजारील तरुण असताना पळवण्याची गरज काय, असा प्रश्न विचारला. पोलिस ताब्यात असलेल्या तरुणीची अधिकृत चौकशीतून सत्य उघड होईल, असे त्यांनी सांगितले. हिंदू संघटनांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले असले तरी प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *