Vanraj Andekar Case : या कारणांमुळे वनराज आंदेकरची हत्या, पोलिसांकडून 1700 पानांचे दोषारोपपत्र अन् 39 साक्षीदारांचे जबाब , खळबळजनक खुलासे

पुणे -प्रतिनिधी

विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सीसीटीव्ही फुटेज, ३९ प्रत्यक्षदर्शींचे जबाब, आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स, आवाज नमुने आणि जप्त ८ पिस्तुले, ७ कोयते व १३ काडतुसे यांसारखे पुरावे सादर करून हत्येमागील तीन कारणांचा खुलासा केला.(Pune Crime )

हत्येचे तिन्ही कारणे

वनराज आणि बहीण संजीवनी कोमकर यांच्यात संपत्तीवरून दीर्घकाळ वाद चालू होता, तर महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत संजीवनीचे नाना पेठेतील दुकान पाडले गेले—ज्यामागे वनराजचेच सांगणे असल्याचा संशय आरोपींना होता.(Vanraj Andekar Case)

तसेच, सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील निखील आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकर व गायकवाड टोळ्या एकत्र आल्या, कारण वनराजच्या राजकीय प्रभावामुळे आंदेकर टोळीला जामीन मिळाला होता.(Crime News)

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत वीज खंडित करून आरोपींनी पाच-सहा राऊंड गोळ्या व कोयत्याने हत्या केली; यापूर्वी दोन प्रयत्न फसले होते. संजीवनी कोमकर, जावई जयंत-गणेश कोमकर व सोम्या गायकवाडसह २१ आरोपींवर कारवाई सुरू असून, आरोपनिश्चिती पुढील सुनावणीसाठी स्थगित.(Vanraj Andekar murder)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *