Porsche car aacident … पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील तीन आरोपींना जामीन …

पुणे:प्रतिनिधी

पुण्यातील गाजलेल्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Porsche car aacident )प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन आरोपींना जामीन मंजूर केला. मात्र, “अल्पवयीन मुलांना मौजमजेसाठी महागडी कार चाव्या, पैसा व एटीएम कार्ड देणे अजिबात स्वीकारार्ह नाही,” अशा तीव्र शब्दांत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना व उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने पालकांच्या बेजबाबदार भूमिकेवर ताशेरे ओढले. या दुर्घटनेत अल्पवयीन चालकाने अतिवेगाने पोर्शे कार चालवत दोन निष्पाप दुचाकीस्वारांचा जीव घेतला होता.(Porsche car aacident)

जामीन मंजूर झालेले आरोपी

अल्पवयीन चालकाचे वडील (कारच्या मागील सीटवर बसलेले).दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा निकटवर्तीय मित्र.ससून रुग्णालयातील वैद्यकीय सहाय्यक (३ लाख रक्कम घेऊन रक्तनमुने बदलले).न्यायालयाने जामिनाच्या कठोर अटी घातल्या – आरोपींनी नियमित ट्रायल कोर्टासमोर हजर राहावे, स्वातंत्र्याचा गैरवापर केल्यास जामीन तात्काळ रद्द. हायकोर्टाने आधी जामीन फेटाळला होता, पण सुप्रीम कोर्टात अपीलनंतर हा निर्णय.

काय आहे प्रकरण?

१८ मे २०२४ च्या मध्यरात्री मुंढवा पबमध्ये (mundhva pub)मद्यपान करून अल्पवयीन मुलगा व दोन मित्रांनी पोर्शे कार भरधाव चालवली. कल्याणीनगरजवळ दुचाकीला धडक देऊन दोघांचा मृत्यू. ससून रुग्णालयात रक्तनमुने तपासासाठी नेले असता, पालकांनी डॉक्टर व सहाय्यकांना लाच देऊन नमुने बदलले. स्वतःचे नमुने देऊन अल्पवयीनला वाचवण्याचा डाव.

न्यायालयाचा ताशेरा

न्यायमूर्ती नागरत्ना यांनी निरीक्षण नोंदवले, “मद्यधुंद अवस्थेत बेदरकार वाहन चालवणे कोणताही उत्सव नाही. दोन प्राण गेले! पालक मुलांना वेळ देण्याऐवजी पैसा, कार व मोबाईल देतात, नियंत्रण सोडतात. कायद्याला अशा वास्तवाशी सामना करावा लागतो.” या निर्णयाने समाजात पालकांची जबाबदारी, कायद्याशी छेडछाड व नैतिक अधःपतनावर गंभीर प्रश्न उपटले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *