पुणे -प्रतिनिधी
पुणे, एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर तीन तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.(Pune Crime) या घटनेमुळे समाजात संतापाची लाट पसरली असून, स्वतःच्या घरात मुली सुरक्षित नसतील तर विश्वास कोणावर ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Minor Assault )
दरम्यान सततच्या अत्याचारांमुळे मुलीचा स्वभाव आणि वागणे पूर्णपणे बदलले होते. ती भितीने आणि भेदरलेल्या अवस्थेत राहू लागली. कुटुंबीयांच्या शंकेच्या भोवऱ्यात पडल्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारले, तेव्हा तिने सगळा धक्कादायक प्रकार सांगितला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharati Vidyapeeth )पिडीत मुलीच्या कुटूंबियांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, पोलिसांनी तीन तरुणांवर बलात्कार तसेच दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.(Women Safety ) हा प्रकार गेल्या तीन ते साडे तीन महिन्यांपासून सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी आशुतोष विजयकुमार पाटील (वय २५), नागेश सुर्यवंशी (वय २१), गौरव माने (वय २०) यांना बलात्कार तसेच प्रीतम जगताप याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तर, एक आरोपी पसार झाला आहे.(Pune Police)
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे कुटूंब भारती विद्यापीठ भागात राहण्यास आहे. आरोपी या परिसरातील असून, गेल्या तीन ते साडे तीन महिन्यांत त्यांनी पिडीत मुलीच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन आशुतोष, नागेश तसेच गौरव या तिघांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी आणि एकट्या-एकट्यांनी तिला गाठून अत्याचार केला. तर, प्रीतम या तरुणाने तिच्या अश्लील चाळेकरून तिचा विनयभंग केला.(Maharashtra News)
)तसेच पाचव्या आरोपीने तिच्याशी व्हिडीओ कॉलकरून तिचा विनयभंग केला आहे. दरम्यान, याप्रकरणात मंगळवारी गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात चौघांना अटक केली आहे. तीन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी बलात्कार केला आहे. सामूहिक अत्याचार झालेला नसला तरी हे आरोपी एकमेकांच्या ओळखीतील असल्याचे समजते. तर, तिघांनी या तरुणीला पकडून तिच्याशी अश्लील चाळे देखील केले आहेत. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक थोरात या करत आहेत.
