Cricket वैभव सूर्यवंशीचा स्फोटक अर्धशतक

पुणे -प्रतिनिधी
वैभव सूर्यवंशीचा ( vaibhav suryawanshi )स्फोटक अर्धशतक, पण शतक हुकलेअंडर-१९ विश्वचषकाच्या सुपर-६ सामन्यात वैभव सूर्यवंशी स्फोटक फलंदाजीने झळकला. तो नेहमीप्रमाणे येताच आक्रमक झाला, पण मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या या लढतीतही असंच घडलं.भारतीय कर्णधार आयुषने नाणेफेक गमावली, पण प्रथम फलंदाजी मिळाली. आयुष तिसऱ्या क्रमांकावर आला, तर आरोन जॉर्जसोबत वैभवने सलामी दिली .
आरोन १६ चेंडूत २३ धावांवर (२ चौकार, १ षटकार) बाद झाला. आयुषही १९ चेंडूत २१ धावांवर माघार घेतला.वैभव मात्र क्रीजवर टिकला. संघाचा स्कोअर ५० ओलांडला, नंतर १०० धावा गाठल्या. ११व्या षटकात, ३० चेंडूत ५२ धावांची (४ चौकार, ४ षटकार) आक्रमक खेळी करत त्याने अर्धशतक साजरं केलं. स्ट्राईक रेट १७३.३३ असा दमदार डाव खेळला, पण शतकाकडे वाटचाल करताना बाद झाला. वैभवच्या विकेटसह भारताने १०१/३चा स्कोअर केला होता.धावा मात्र चांगल्या होत होत्या, विकेट मात्र लवकर पडत होत्या. भारतीय (india ) संघासाठी ही चिंतेची बाब ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *