Vasant More : वसंत मोरेंना कोणत्याह क्षणी अटक होण्याची शक्यता ; अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे-प्रतिनिधी

पुणे शहरातील राजकारणात खळबळ उडाली असून, शिवसेना (UBT) नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocity Act )दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला.(Bail Rejected) यामुळे त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करत असून, पुढील कारवाईला वेग येईल.

प्रकरणाचे तपशील

वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष अविनाश लहाडे यांच्या वडिलांबद्दल वादग्रस्त विधान केले. या वक्तव्याने भावना दुखावल्याची तक्रार लहाडे कुटुंबाने केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बदनामी आणि मानसिक त्रास झाल्याचा आरोप. यानुसार SC/ST प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.(Pune Politics)
न्यायालयीन निकाल
मोरे यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला, पण न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर फेटाळला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांना अटकेचा मार्ग मोकळा.
राजकीय वातावरण तापले असून, पुढील घडामोडींवर लक्ष. पोलिस तपास जोरदार.(ShivSena UBT)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *