पुणे -प्रतिनिधी
डिबेट शो संपल्यानंतर बाहेर पडताना भाजप नेत्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यांवर टीका केल्याबद्दल काही कार्यकर्त्यांनी पवार यांना घेरले. त्यापैकी तुषार दामगुडे यांनी शिवीगाळ करत कमरेला पिस्तूल दाखवून धमकी दिली आणि चार-पाच जणांनी मारहाण केली, असा आरोप पवार यांनी केला आहे.(Pune Politics)
“विचारांची लढाई विचारांनी लढावी, हिंसेने नाही,” असे त्यांनी सांगितले.या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा लोकशाही मूल्यांवरचा आघात असल्याचे म्हटले. मतभेद असले तरी हिंसेने विरोध दाबण्याचा प्रयत्न अस्वीकार्य आहे, असे त्यांचे मत आहे.पोलिसांनी (Pune Police ) गुन्हा दाखल करून काही आरोपींना ताब्यात घेतले असली तरी या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा हिंसक घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. निष्पक्ष चौकशीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(Pune )
