पुणे -प्रतिनिधी
अजित पवारांसह(ajit pawar death ) सहा जणांचा मृत्यू झालेल्या बारामती विमानतळाजवळील गोजुबावी अपघातप्रकरणी सरपंच कल्याण आटोळेंनी “विमानातून निळ्या पॅन्टवाला व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती” असा दावा केल्यानंतर आता ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार (Deepak kedar) यांनी यावरून हल्लाबोल केला आहे. केदार यांनी सोशल मीडियावर आटोळेंची माहिती खोटी असून ती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत गृहविभागाकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
सरपंचाची धक्कादायक माहितीगोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी सांगितले, “अपघातानंतर विमानाचा दरवाजा उघडा होता आणि त्यातून कोणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, तितक्यात मोठा स्फोट झाला.” अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हेच पुष्टी करत “पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू” असा उल्लेख केला.केदारांचा खळबळजनक आरोपदिपक केदार यांनी सोशल मीडियावर लिहिले, “सीसीटीव्ही (CCTV ) फुटेजमध्ये विमान कलले, खाली पडले आणि एका सेकंदात हवेतच स्फोट झाला. एवढ्या कमी वेळात कोणी पोहोचू शकत नाही, तरी आटोळे ‘निळ्या पॅन्टवाला’ उडी मारत असल्याचे सांगत आहेत का?” ते म्हणाले, “हे दिशाभूल करणारे आहे.
विमान खाली पडल्यावर मोटरसायकलने जाऊन विमानातून उतरणारा पाहिला हा दावा खोटा आहे.”बारामती विमानतळावर संशयकेदार यांनी बारामती विमानतळाच्या आजूबाजूला दिशाभूल माहिती येण्याचे कारण विचारत “अजित पवारांवरील घातपाताची प्रक्रिया येथेच सुरू होती का?” असा प्रश्न उपस्थित केला. कागदपत्रे जळली नाहीत, राजेश टोपेंना चुकीचा टाईम सांगणारा तरुण विमानतळावरच, हे सर्व विमानतळाशी जोडलेले असल्याचे त्यांनी सांगितले.सखोल चौकशीची मागणी”शेवटचा कॉल ज्याच्याकडून आला त्यावेळी अजित पवारांचे लोकेशन काय होते? ईडीआर-सीडीआर समोर यावे. स्फोट झाला की घडवून आणला, याची तपासणी गृहविभागाने करावी,” अशी मागणी करत केदार म्हणाले, “बारामती (baramati ) विमानतळाच्या हलचाली आधुनिक तंत्रज्ञानाने तपासाव्यात. पारदर्शक घटनाक्रम बाहेर येणे गरजेचे आहे.” या वादामुळे अपघातप्रकरणी पुन्हा संभ्रम वाढला आहे.
