पुणे – प्रतिनिधी
पुण्याच्या कोथरूड (Kothrud Murder)परिसरात अल्पवयीन मुलीशी मैत्रीच्या रागातून २३ वर्षीय नागेश संजय जाधव (Nagesh Jadhav )याची १० जणांच्या टोळीने अमानुष मारहाण करून हत्या केली. (Pune Crime )या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.
शिवाजीनगरात ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या नागेशला मुलीच्या मोबाईलवरून भेटीसाठी (Love Affai rMurder)कोथरूडमधील एसएनडीटी परिसरात बोलावले गेले. तिथे दबा धरून वाट पाहत असलेल्या मुलीच्या आई-वडील, चुलतभाऊंसह नातेवाईकांनी लाकडी दांड्यांनी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. १४ मार्च सायंकाळी ७:१५ च्या सुमारास घडलेल्या या हल्ल्यात नागेश जखमी झाले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.(Minor Girl Friendship)
रात्री ८ वाजता नागेशच्या फोनवरून त्यांच्या आईला फोन आला, ज्यात आरोपींनी शिवीगाळ करत “मारलंय, घेऊन जा नाहीतर फेकून देऊ” अशी धमकी दिली. आईने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हा उघडकीस आणला.गुन्हा दाखल झालेल्यांची नावेबबली अनिल शिंदे, सुनीता सुनील शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदेबबली योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवारसुनील शिंदे, पप्पू शिंदे, योगेश शिंदे, अनिल शिंदेभारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमांनुसार कोथरूड पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला असून काहींना अटक झाली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून नागेशच्या आईने “आरोपींना फाशी द्यावी” अशी मागणी केली आहे.(Justice For Nagesh)
