Ladaki Bahin Yojana : लाडकी बहिण’ला कमी करण्याचा कट कोण टाकतोय?

पुणे -प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असला तरी लाभार्थी महिलांना तांत्रिक पेचप्रसंगी अडकवले गेले आहे. योजनेचा लाभ बंद होईल या भीतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांसमोर आता पोर्टलवर नवीन केवायसीचा दरवाजाच बंद झाला आहे.ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी होत्या किंवा जुन्या प्रक्रिया चुकल्या होत्या, त्यांना फक्त दुरुस्तीची संधी मिळत आहे. (Ladaki Bahin Yojana )

मात्र ज्यांची ई-केवायसीच झालेली नाही,(Ladaki Bahin Yojana ) त्यांच्यासाठी पोर्टलवर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. सुरुवातीला ओटीपी न येणे, संकेतस्थळ सतत हँग होणे यामुळे अनेकांच्या केवायसी अपूर्ण राहिल्या. ३१ डिसेंबर २०२४ ही अंतिम मुदत होती, शेवटच्या टप्प्यात साइट अनेकदा बंद पडली. नंतर ३१ मार्च २०२५ पर्यंत जुन्या केवायसी दुरुस्तीसाठी मुदत वाढवली, पण नवीन केवायसी बंद झाल्याने रखडलेल्या महिलांवर संकट कोसळले आहे.प्रशासनाकडून माहिती लपवली?या प्रकरणात स्थानिक प्रशासनाकडून किती महिलांनी अर्ज केले, कितींची केवायसी (KYC) पूर्ण झाली किंवा किती वगळल्या गेल्या याबाबतची अधिकृत आकडेवारी मिळाली (Update)

नाही. प्रशासनाने “माहिती उपलब्ध नाही” असे सांगितले. लाभार्थी पूजा भोसले (Puja Bhosale) म्हणाल्या, “सुरुवातीला ओटीपी येत नव्हते, आता पोर्टल बंद. सायबर कॅफे सांगतात नवीन केवायसी होत नाही. आम्हाला मुद्दाम लाभापासून दूर ठेवण्याचा हा डाव आहे का?”लाभार्थी महिलांमध्ये नाराजी वाढत असून, प्रशासनाने तातडीने नवीन केवायसीचा पर्याय उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *