Pune Crime : माझे कस्टमर का पळवतोस?” संशयावरून झालेला भांडण विकोपाला; कामगाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत केली हत्या

पुणे – प्रतिनिधी

बिबवेवाडी परिसरातील (Bibvevadi Area ) सलूनमधील ग्राहक वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वीच्या सलूनमधील ग्राहक नव्या दुकानाकडे वळवत असल्याच्या संशयाने सलून मालकाने साथीदारांसह हल्ला केल्याचा आरोप असून, बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली आहे.
मृत तरुणाचे नाव मोहमद शमी फिरोज कुरेशी (वय २५) (Mohmmad Kureshi ) असे असून, तो मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी होता. शमी कात्रजमधील ‘ट्विस्टर सिझर मेन्स सलून’मध्ये दोन वर्षे काम करत होता. २६ जानेवारी २०२६ रोजी त्याने नोकरी सोडली आणि ९ फेब्रुवारीला भाऊ सलमान कुरेशी (वय १८) सोबत बिबवेवाडीत ‘साई स्मार्ट हेअर सलून’ सुरू केले. पूर्वीच्या सलूनमधील ग्राहक त्याला ओळखत असल्याने काही जण नव्या दुकानात येऊ लागले.(Pune Crime)
१९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता सौरभ रोहिदास चोरघे (वय २२) आणि त्याचे दोघे मित्र अनिकेत सतिश चर्‍हाटे (वय २७) व रोहित संतोष भालशंकर (वय २४) दुकानात घुसले. “तू माझे ग्राहक का बोलावतोस?” या संशयाने सौरभने शमीला कानाखाली मारली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी झटापट उडाली आणि तिघांनी शमीला खाली पाडून छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केली.शमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेची तक्रार शमीचा भाऊ सलमान कुरेशी याने दिली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. किरकोळ व्यावसायिक स्पर्धा गैरसमजातून अशी टोकाची घटना घडणे चिंताजनक आहे.(Crime News )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *