Rohit Pawar : दादांच्या मित्रांकडून VSR ला का संरक्षण? रोहित पवार काय म्हणाले?

पुणे -प्रतीनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार  (Rohit Pawar ) यांनी अजित पवारांच्या विमान अपघात (Ajit Pawar Accident )प्रकरणात VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट रोख तीव्र केला असून, ‘दादांचे मित्र आज VSR ला का वाचवतात?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे .
ते म्हणाले की, अजित दादा (Ajit Pawar) हे त्या मित्रांचे जवळचे होते आणि आता कंपनीला संरक्षण देण्याचे कारण काय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी या तपासात लक्ष घालाव रोहित पवार यांनी VSR कंपनीवर घातपाताचा संशय व्यक्त करत ती तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून,
नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्या राजीनाम्यासाठी मोदींना ईमेल पाठवला आहे . ब्लॅक बॉक्स व इंधन टँकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी करताना, सत्ताधारी मित्रमंडळींच्या प्रभावामुळे तपास रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *