Pune Crime : विवाहबाह्य संबंधातून पत्नीला जीवे मारण्याची धमकी ; मी तिच्याशीच. लग्न करणार ! पती विरोधात फुरसूंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे – प्रतिनिधी

पुण्याच्या फुरसुंगी पोलिस (Fursungi Crime) ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे . विवाहबाह्य संबंधाच्या वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली . पती विरोधात पत्नीने फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली .(Domestic Violence)

भेकराईनगर, फुरसुंगी येथील व्यवसायी संतोष पोपट थोरात (वय ३६) यांच्यावर पत्नी प्रियांका याने कौटुंबिक जाच, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर आरोप करत फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune Crime News)२०१९ मध्ये प्रियांका आणि संतोष यांचा विवाह झाला असता, सुरुवातीला संसार सुखी चालू होता. मात्र २०२५ च्या जून महिन्यात प्रियांकाने पतीच्या मोबाईल फोनवर दुसऱ्या मुलीशी चॅटिंग, फोटो आणि संशयास्पद संभाषणे पाहून धक्क बसला.(Threat ToLife)

संतोषने चौकशी केल्यावर “ती माझी मैत्रीण आहे आणि तिच्याशी लग्न करणार” असे उद्धट उत्तर दिले. पुढे तपासात हडपसर येथील ‘नंदू’ (नाव बदललेले) या मुलीशी संतोषचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. प्रियांकाने या संबंधांना विरोध दर्शवला असता, संतोषने “नीट राहायचे असेल तर राहा, नाहीतर घरी जाऊन राहा” असे म्हणत तिच्यावर मारहाण सुरू केली. माहेरची मंडळी मध्यस्थी करून समजावले तरी संतोषने वागणूक सुधारली नाही.(Extra marital Affair)

२२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रियांका व माहेरच्या लोकांनी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतोषने सर्वांना शिवीगाळ करत “तुम्हा सगळ्यांना बघून घेतो” अशी भयावह धमकी दिली. या घटनेने कुटुंबात तणाव वाढला. ४ मार्च २०२६ रोजी पुन्हा याच विवाहबाह्य संबंध व कौटुंबिक वादावरून भांडण बिघंडले. संतोषने प्रियांकाला पुन्हा प्रचंड मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर ५ मार्च २०२६ रोजी प्रियांका त्यांच्या ३ वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी परतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *