पुणे -प्रतिनिधी
सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास(Lonikand Suicide) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणीकंद परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(Married Woman Suicide)
आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव वैष्णवी जामकर (Vaishnavi Jamkar) असे आहे. तिचे लग्नाला अवघे आठ महिने झाले होते. या काळात सासू, सासरे आणि पती यांच्याकडून सतत छळ होत असल्याची, तसेच पैशासाठी दबाव टाकला जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी (Lonikand Police) दिली. या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.(Women Safety)
या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवीच्या सासू, सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून, सासरकडील छळ, पैशांची मागणी आणि आत्महत्येचे नेमके कारण समजण्यासाठी अधिक तपास केला जात आहे.(Maharashtra News)
लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत सासरच्या छळाला कंटाळून (Domestic Abuse) वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलल्याने पुन्हा एकदा हुंडाबळी, कौटुंबिक छळ आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
