सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरात (Bhondu Baba) याला अटक केल्यानंतरही त्याचा माज कायम आहे. पोलिस कोठडीत गेल्यानंतरही तो डरला नाही. भोंदुगिरीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. (Ashok Kharat)
पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राजीनामा दिला. तरीही खरातचा माज दिसून येत आहे. नेमके काय घडले? भोंदू बाबाने काय म्हटले? सविस्तर जाणून घ्या.ग्रामस्थांचे गंभीर आरोपमिरगावातील ग्रामस्थांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केले. मंदिर बांधल्यानंतर त्याने एका शेतकऱ्याची वहिवाट बंद केली. मंदिराला कंपाऊंड घालताना दमदाटी केली आणि रस्ता बंद केल्याचा आरोप एका ग्रामस्थाने केला.(Women Exploitation)
त्यामुळे तो गेल्या आठ महिन्यांपासून पत्र्याच्या खोलीत राहतोय.रुपाली चाकणकर प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांखालील नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या. खरातसोबतचे व्हायरल फोटो आणि व्हिडिओमुळे त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सादर केला. आता महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागेल,(Nashik Crime) अशी माहिती आहे.सुनील तटकरे पाठिशी घालत होते? – रुपाली ठोंबऱ्यांचा आरोपप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रुपाली चाकणकरांना पक्षात पाठिशी घालत होते, असा आरोप राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केला.
“महिला आयोगाचा राजीनामा घेतलाच, आता प्रदेशाध्यक्षपदावरूनही दूर करा,” अशी मागणी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. चाकणकर आणि तटकऱ्यांच्या अनामिका कापल्याच्या फोटो कसे समोर आले? देवगिरी आणि सहयोग (अजित पवारांच्या निवासस्थानांबाहेरील) उतारे खरातच्या सांगण्यावरून ठेवले गेले नाही ना? सीडीआर तपासावे, अशी मागणी ठोंबरे यांनी केली. “पहिली विकेट पडली, पुढे काय होईल ते पहा,” असं सूचक विधान करून पक्षातील अंतर्गत कलह सूचवला.’नोटीस सोडा, अटकेचा विचार करा’ – सुषमा अंधारेरुपाली चाकणकरांनी नोटीस पाठवण्याचा विचार सोडून अटकेच्या धोक्याचा विचार करावा, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.(Captain Kharat)
राजीनाम्यानंतर चाकणकरांचे स्पष्टीकरण हे “केविलवाणी धडपड” आहे, असेही त्या म्हणाल्या. चाकणकरांनी अनामिका कापल्याचे आरोप खोटे असल्याचे सांगून अंधारेंना नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले होते, त्याला अंधारे यांनी उत्तर दिले.भोंदू बाबाची धमकी उघडअशोक खरातने पोलिसांना “घोर अपराध केला असून कोप होईल,” अशी धमकी दिल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेला त्याच्या कृत्यांची कुणकुण लागली. एका महिलेच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी त्याची चित्रफीत सोशल मीडियावर आली.
