पुणे – प्रतिनिधी
पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाका परिसरात रविवारी (ता. २२) सायंकाळी अज्ञात इसमांनी चारचाकी वाहनाला दुचाकी अडवून दाम्पत्याला “लोनचे हप्ते थकले, गाडी ओढून नेऊ” अशी धमकी देत शिवीगाळ केला. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)
फिर्यादी अक्षय भाऊसाहेब सानप (Akshay Sanap )(३०, फातीमानगर, पुणे) व पत्नी ऋषाली हे अक्कलकोट देवदर्शन करून परतत होते. सव्वाचार वाजता टोलनाक्यापुढे २०० मीटर अंतरावर काळ्या स्प्लेंडर दुचाकीने (MH ४२ BR ०७) गाडी अडवली. हप्ते थकले नसल्याचे सांगितल्यावरही इसमांनी उधळपात्र भाषेत बोलत गाडी बाजूला घेण्याचा दबाव टाकला. पाठलाग करून यवतमध्ये(yavat Crime ) बँक ऑफ बडोदा शाखेजवळ पुन्हा अडवून धमकावले.
अक्षय यांनी प्रसंगावधान राखत दुचाकीचा फोटो काढला आणि डायल ११२ वर मदत मागितली. पोलिस येत असल्याचे पाहून इसम पळून गेले. यवत पोलिसांनी BNS कलम १२६(२), ३५२, ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
