पुणे – प्रतिनिधी
इंस्टाग्रामवरून (Instagram) ओळखीचं नेटवर्क वाढवून ‘आयफोन १७ प्रो मॅक्स’ (I Phone 17 Max) भेट देण्याचं खोटं आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी २६ वर्षीय तरुणीला ११ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा गंडा घातला. हवेली तालुक्यातील कवडीपाठ टोलनाक्याची सलोनी बापू अरवडे ही संगणक प्रोग्रामिंगचं प्रशिक्षण घेणारी तरुणी या जाळ्यात अडकली.(Pune Crime)
लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.५ डिसेंबर २०२५ रोजी ‘विकास शर्मा’(Vikas Sharma) नावाच्या खोट्या आयडीने इंस्टाग्रामवर संपर्क साधून सलोनीचा विश्वास संपादन केला. स्वतःला यूकेमधील रेस्टॉरंट व्यवसायिक म्हणून ओळख करून मैत्री वाढवली आणि महागडा आयफोन पाठवतोय असं सांगितलं. नंतर मुंबई कस्टम अधिकाऱ्याच्या फोन कॉल्सनी कस्टम शुल्क, जीएसटी, इनकम टॅक्स, कॅश शो मनी अशा नावाखाली १३ ते १५ डिसेंबरदरम्यान विविध बँक खात्यांमध्ये आणि यूपीआयवर रक्कम उकळली. सीबीआय आणि आरबीआय अधिकाऱ्यांच्या धमक्यांनी तिला करिअर आणि कुटुंबावर कारवाईची भीती दाखवली.
पैसे परत मागितल्यावर संपर्क तोडणाऱ्या आरोपींचा भ ND आल्यानंतर सलोनीने सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार दाखल केली. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) आणि भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२), ३५१, ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा (Crime News) नोंदवला गेला. पोलिस (Police News) तपासात हे एकट्याचे नव्हे तर संघटित फसवणूक (Fraud News) सॉफ्टवेअर टोळीचं काम असल्याचा संशय व्यक्त करत आहे
