पुणे -प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मोरगावमध्ये (Morgav )बुधवारी सकाळी खळबळजनक घटना घडली. मोरगाव पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोर एका अज्ञात तरुणाने भरधाव टेम्पोच्या चाकाखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली, ज्यामुळे जागीच त्याचा मृत्यू (Death) झाला.सकाळचे सात ते आठ वाजता घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही (CCtv )फुटेजमध्ये कैद झाले आहे.
रस्त्याकडील दुकानाच्या पायरीवर शांतपणे बसलेला हा तरुण अचानक उठला आणि समोरून येणाऱ्या अवजड टेम्पोच्या मागील चाकाखाली धावत गेला. चालकाने ब्रेक दाबला तरी उशीर झाला आणि तरुणाचा जागीच (DEath) अंत झाला. प्राथमिक तपासात तो स्थानिक नसून परजिल्ह्यातून आल्याचा संशय असून, मानसिक दडपण किंवा कौटुंबिक कलह (Family Matter) हे कारण असू शकते. मोरगाव पोलिस तपास करत आहेत.
