Pune Crime : तरुणांचा “पाषाण बाप” गोंधळ; व्यावसायिकाला मारहाणीनंतर अपघात, ससूनमध्ये दाखल

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातील पाषाण परिसरात (Pashan Area ) मध्यरात्री घडलेल्या क्रूर हल्ल्याने दादागिरीची वाढती प्रवृत्ती पुन्हा समोर आली आहे. १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० च्या सुमारास विठ्ठलनगरमधील गणेश मंदिराजवळ रिअल इस्टेट व्यावसायिक सौरभ धनंजय जाधव (२६)(Dhannajay Jadhav) आणि त्यांचा मित्र नागेश कांबळे  (Ganesh Kamble )गप्पा मारत उभे असताना मोटारसायकलवर आलेल्या तिघांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.जाधव हे ‘मीनाक्षी इंटरप्रायझेस’ या फर्मद्वारे रिअल इस्टेट व्यवसाय करतात आणि परिसरात त्यांची चांगली ओळख आहे.

 

आरोपींनी प्रथम शिवीगाळ करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र काही अंतरावर वळून परत आले. “आम्ही पाषाणचे बाप आहोत, आज तुला मारून टाकतो,” अशी धमकी देत त्यापैकी एकाने लोखंडी हत्याराने जाधव यांच्यावर वार केला. जाधव यांनी खाली वाकून बचाव करण्याचा प्रयत्न केला, तरी हत्यार डोक्याच्या मागील बाजूला लागले आणि ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले आणि निघताना एका चारचाकी वाहनाला धडक दिली.या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस(Chaturshrungi police Station)ठाण्यात संस्कार दीपक निम्हण (१९), संग्राम राहुल ढमाले (२०) आणि अमर चौधरी (१९) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.(Crime News)

 

जाधव यांनी ससून रुग्णालयात (Sasun Hospital)उपचार घेतल्यानंतर तक्रार नोंदवली. पाषाण आणि आसपासच्या भागात तरुणांकडून होणाऱ्या दादागिरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे, तर विकासकामांमुळे बदलणाऱ्या या परिसरात व्यावसायिक स्पर्धा किंवा वर्चस्वाच्या मानसिकतेमुळे असे प्रकार वाढत असल्याची चर्चा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *