पुणे -प्रतीनिधी
पुणे जिल्ह्यातील शिरूर ( Shirur ) तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे प्रापंचिक वादातून मनोहर नागोराव कांबळे (वय ५३) याने पत्नी सविता मनोहर कांबळे (वय ३८) यांच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून खून केला आणि स्वतः शिक्रापूर पोलीस (Shikrapur Police Station) ठाण्यात हजर होऊन कबुली दिली.
पहाटे अंमलदार अमोल चव्हाण व इतर पोलिसांना ‘मी माझ्या बायकोचा खून केला’ असे सांगितल्याने त्याला ताब्यात घेऊन तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सविता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या.घराच्या बाहेरील कडी उघडून आत पाहिले असता हातोडा शेजारी असल्याचे दिसले, तर तातडीने रुग्णालयात नेसले तरी त्यांचा मृत्यू (Death ) झाला.
पीआय दीपरतन गायकवाड (Pi Deepratn Gaikwad) व उपपीआय महेश डोंगरे यांनी पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मुलगा राजेश कांबळे (वय १९) यांच्या फिर्यादीवरून कारवाई झाली. तळेगाव ढमढेरे येथील आरंभ सोसायटीत राहणारे हे जोडपे मूळ शिरसो श्रीरामनगर (मूर्तिजापूर, अकोला) चे असून पुढील तपास सुरू आहे.(Pune Crime)
