Vakad पिंपरी-चिंचवडमध्ये कामगाराला नग्न मारहाण: मॅनेजरचा अमानवी कृत्य व्हायरल

पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी

वाकड येथील ‘की-इन’ हॉटेलमध्ये घडलेल्या एका क्रूर घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. दोन दिवस सुट्टी घेतल्याबद्दल हॉटेल हेल्पर निलेशला मॅनेजर महेश शेट्टीने विवस्त्र करून प्लास्टिक पाईपने भीषण मारहाण केली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.घरगुती कारणांमुळे निलेश दोन दिवस कामावर गेला नाही, (Vakad)

याचा राग मॅनेजर शेट्टीला इतका आला की, निलेश रुजू झाल्यावर त्याने त्याचे कपडे काढायला भाग पाडले. नग्न अवस्थेत प्लास्टिक पाईपने मारहाण करत तो म्हणाला, “दांडी मारण्याची सवय सुधारेल का?” ही मारहाण इतकी तीव्र होती की, निलेशच्या पाठीवर व्रण उमटले आणि तो वेदनेने विव्हळला. ही अमानुष वागणूक सहकाऱ्यांसमोर घडली, ज्यामुळे तेही थरथर कापले.फोटो व्हायरल झाल्यावर निलेशने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने जखमांचे फोटो आणि साक्षीदारांची यादी दिली.

मात्र, पोलिसांनी केवळ आरोपी मॅनेजरला नोटीस बजावून आणि समज देऊन सोडून दिले. या सौम्य कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत – असंघटित क्षेत्रातील कामगारांना अजूनही गुलामगिरीची वागणूक सहन करावी लागते का? घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलीस सांगतात, पण पीडिताच्या न्यायाची मागणी वाढत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *