पुणे -प्रतिनिधी
एमपीएससी MPSC आंदोलना प्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे . MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी एस. एम. जोशी SM Joshi पुलावर आंदोलन करणाऱ्या १५ जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाची परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांचे नाव गुन्ह्यात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार समीर जयराम पवार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियंका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभुळकर, साहेबराव क्षिरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Police Case
पोलिसांच्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी विद्यार्थी प्रतिनिधी आणि अन्य विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार २ ऑक्टोबर रोजी अलका टॉकीज चौक, अहिल्या अभ्यासिका आणि एस. एम. जोशी पुलाजवळ आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले होते. त्यामुळे आंदोलनासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती संबंधितांना देण्यात आली होती.MPSC Lokseva
तरीही १ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास काही विद्यार्थी प्रतिनिधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी पेठेतील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोरील सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एकत्र केले. तेथे परवानगीशिवाय आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरील वाहतूक अडविण्यात आल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास भिंगारदिवे करीत आहेत.
दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी नवी पेठेतील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोर झालेल्या आंदोलनाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाच्या आयोजकांनी आमदार रोहित पवार यांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आंदोलन सुरू झाले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आंदोलनाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार यांचे वक्तव्य
“आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो, त्यामुळे शाळेला किंवा रुग्णवाहिकेला त्रास झाला नाही. आम्हाला न्यायालयाने तिथून उठा, असे सांगितले नाही. त्यामुळे आम्ही या जागेवरून उठणार नाही,” असे स्पष्ट वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
— रोहित पवार, आमदार
