Spa आसामचा मेहबूब खान अटक; विमाननगर मधील थाई स्पा मध्ये देहव्यापार

 

पुणे – प्रतिनिधी

पुण्यातील विमाननगर परिसरात थाई स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या शिक्षण आणि सांस्कृतिक ओळखीवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विमानतळ पोलिसांच्या छाप्यात पाच तरुणी सापडल्या असून, मुख्य सूत्रधाराला अटक झाली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.विमाननगरातील दत्त मंदिर चौकाजवळील गुलमोहर रेजन्सी इमारतीत सिग्नेचर थाई स्पा चालवला जात होता. बाहेरून आकर्षक आणि कायदेशीर दिसणाऱ्या या स्पामध्ये प्रत्यक्षात काय चालले होते याचा उलगडा पोलिस कारवाईत झाला. काही दिवसांपासून नागरिकांकडून मसाजच्या बहाण्याने संशयास्पद हालचालींच्या तक्रारी येत होत्या. पोलिसांनी या तक्रारी दुर्लक्षित न करता गुप्त तपास सुरू केला. खात्री पटल्यानंतर शनिवारी सायंकाळी नियोजनबद्ध छापा टाकण्यात आला.छापेमारीदरम्यान स्पा सेंटरमध्ये पाच तरुणी देहव्यापार करत असल्याचे आढळून आले. मुख्य आरोपी मेहबूब खान लष्कर (वय २८, रा. आसाम) याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने जास्त कमाईचे आमिष दाखवून तरुणींना स्पामध्ये काम देण्याच्या नावाने देहव्यापारात ढकलल्याचे कबूल केले. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांवरच त्याची उपजीविका चालत असल्याची माहितीही समोर आली. विमाननगर परिसरात अशा प्रकारची वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी स्पा सेंटरमधील साहित्य जप्त केले असून, तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *