kidnap … लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण … कोयत्याचा धाक दाखवून केला तो प्रकार ; गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुणे -प्रतिनिधी

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण (kidnap) करून कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने चंदननगर पोलीस हद्दीतून पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७२/२०२६ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील हे आरोपी असून, त्यांच्याकडून ७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या सूचनांनुसार युनिट-४ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव (pi kanchan jadhav) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.(pune crime)

embed video youtubeclassroom stopwatch

२ फेब्रुवारी रोजी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक गस्तीवर असताना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन दिवसांपूर्वी येरवडा शास्त्री चौकात स्विफ्ट कारमध्ये बसवून लुटलेल्या इसमाचे आरोपी जत्रा हॉटेल, खराडी येथे बसले आहेत.या माहितीची खात्री करून पथकाने हॉटेलजवळील कारमधून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी ओळख पटवली – राहुल किसन सावंत (१९, रा. खराडी), निशांत झुंबर बागुल (२१, रा. चिखलठाण, पारनेर) आणि महेश रामकिसन सोनटक्के (२०, रा. लोहगांव). निशांतने कबूल केले की, ३० जानेवारी रात्री पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या इसमाला शास्त्रीनगर चौकात लिफ्ट देऊन गाडीत बसवले. त्यानंतर मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवला, मोबाइल हिसकावला आणि ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करून घेतले. रात्री २.३० वाजता कोरेगाव पार्कजवळ सोडले.अंगझडतीत फिर्यादीचा चोरलेला मोबाइल, तीन मोबाइल, पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच १७/सीव्ही/३१९६) आणि कोयता जप्त. आरोपी व मालमत्ता येरवडा (yerwada) पोलीसांना सोपवण्यात आल्या. पुढील तपास सुरू आहे .

सदरची उल्लेखनिय कामगिरी युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार, हरीष मोरे, एकनाथ जोशी पोलीस हवालदार प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, नागेशसिंग कुंवर, शरद झांजरे, वैभव रणपिसे, विशाल इथापे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *