Spa … पैशांचं आमिष दाखवत …. जबरदस्तीने तरुणीकडून करून घ्यायचे तो व्यवसाय ! पोलिसांनी छापा टाकला अन् केला पर्दाफाश … समोर आले धक्कादायक सत्य

पुणे -प्रतिनिधी

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एकाच रात्री चार ठिकाणी छापे टाकून आठ महिलांची सुटका केली. या मोहिमेने शहरातील बेकायदेशीर स्पा नेटवर्क पुन्हा उघडकीस आले.विशालनगरमधील ‘इंटरनल फॅमिली स्पा’वर छाप्यात चार महिलांना मुक्त करण्यात आल्या. वाकड पोलीस हद्दीत रात्री १० वाजता झालेल्या कारवाईत स्पा चालवणाऱ्या महिलेसह मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला पकडण्यात आले.(pune crime )

पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.निगडीतील ‘ईगल स्पा’मधून दोन महिलांची सुटका झाली. तपासात पैशांच्या लोभाने जबरदस्तीने देहव्यापार करवून घेण्याचे गंभीर आरोप समोर आले. तसेच, कृष्णा लॉज आणि आळंदीतील योगीराज लॉजवर प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली.पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे आणि निरीक्षक नितीन गीते यांच्या नेतृत्वात पार पडली.मागील महिन्यात चिंचवडमधील निक्की लॉज, काळेवाडीतील लेमन ग्रास थाई स्पा (spa) आणि सांगवीतील औरा थाई स्पावर वर्षभर बंदी घालण्यात आली.

२०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २५ स्पावर छापे, ४५ अटक आणि ६३ महिलांची सुटका केली आहे. पोलिसांचा इशारा: स्पाच्या नावाने अवैध धंदा चालवला जाणार नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *