पुणे:
कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यात आईला पळवून नेल्याच्या दहा वर्षांच्या सूडाग्नीने एका तरुणाने आईच्या प्रियकराचा क्रूर खून केला आहे. इरैय्या मठपती या तरुणाने भर रस्त्यात ५१ वर्षीय बसप्पा होसमानी याला तब्बल १६ वेळा चाकू भोसकून मारले आणि खून केल्यानंतर मृतदेहावर (death body)छाती ठेवून पोलिसांना फोन करून कबूल केले आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.(crime)
दहा वर्षांपूर्वी बसाडोनी गावचा बसप्पा होसमानी याने इरैय्याच्या आईसोबत प्रेमसंबंध जोडले आणि दोघे पळून कोल्हापूरला गेले होते. तिथे त्यांनी नवे आयुष्य सुरू केले होते. इरैय्याला हे सहन झाले नव्हते आणि तो दहा वर्षे सूडाच्या भावनेने पेटला होता. तो सतत संधी शोधत होता आणि अखेर सवदत्तीला बसप्पा आल्याची माहिती मिळाल्यावर त्याने कट कारवायला ठरवले.बसप्पा सवदत्ती तालुक्यातील यल्लम्मा मंदिराजवळ बाईकवरून जात होता. इरैय्याने गाडीने त्याला जोरात धडक दिली आणि जमिनीवर पडताच चाकू काढून १६ वेळा भोसकले.
बसप्पाचा जागीच मृत्यू झाला. खून ( murder)करून इरैय्याने मृतदेहावर पाय ठेवला आणि पोलिसांना फोन करून म्हटले, “मी खून केला आहे, येता घ्या मला.” हे दृश्य पाहून उपस्थित लोक हादरून गेले आणि घाबरले.फोन मिळताच सवदत्ती पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. इरैय्याने गुन्ह्याची कबूली दिली आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचे सविस्तर तपशील बाहेर येण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
