Lonavala : लोणावळ्यात सनसेट पाहण्याचा मोह जीवावर बेतला, दरीत कोसळून प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा मुलगा प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू


पुणे- प्रतिनिधी

प्रवासादरम्यान निसर्गरम्य ठिकाणी थांबून फेरफटका मारायचा प्रयत्न मृत्यूला आमंत्रण ठरला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील २६ वर्षीय प्रज्वल वसंत गिरी (prajwal vasant giri ) याचा लोणावळा (lonavala) येथील दरीत कोसळून मृत्यू झाला.प्रज्वल हे पुण्यात बीएडचे शिक्षण घेत एमपीएससीची तयारी करीत होते. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे ते पुत्र होते.
८ फेब्रुवारी रोजी नातेवाईकांसोबत मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळ्यात अल्पोपहारासाठी थांबले. प्रज्वल आणि मावसभाऊ टेकडीवर फेरफटका मारायला गेले.निसर्गाचा आनंद घेताना पाय घसरले आणि प्रज्वल खोल दरीत कोसळला. lonavala
सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू (death) झाला. कुटुंबावर शोककळा कोसळली आहे.परिसरातील नागरिकांनी प्रवासादरम्यान अशा ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *