Pune crime : दारू पिऊन वाहन चालवणं टाळा, अन्यथा असं होईल

पुणे – प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड (pimpri  chinchwad ) परिसरात दारू पिऊन वाहन चालवण्यावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. (Pune crime) या भांडणात दोघांनीही एकमेकांवर बिअरच्या बाटल्या फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना ८ फेब्रुवारी रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास चाकणजवळील वैदुवाडी येथील पार्किंग ग्राउंडजवळ घडली. चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.नागेश बळीराम चिम (२४, वैदुवाडी, खेड) यांनी सचिन श्रीराम आरेकर (२३) याच्याविरुद्ध तक्रार दिली.

नागेश सांगतात, दोघे मित्र असताना सचिन मद्यधुंद असल्याने त्याने गाडी चालवू नये म्हणून समजावले. यातून भडकलेल्या सचिनने गाडीतून बिअरची बाटली काढून नागेशच्या डोक्यावर मारली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सचिनवर खुनाचा प्रयत्न आणि शांतता भंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे (.Pune crime  सचिननेही नागेशविरुद्ध प्रतिकार तक्रार केली. त्यानुसार, मद्यपानानंतर गाडीकडे जाताना नागेशने अडवून वाद घातला आणि बिअरची बाटली फेकली. सचिनने डोके वाचवले, पण बाटली उजव्या मनगटावर आदळली, ज्यामुळे हाताला सौम्य दुखापत झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *