पुणे -प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (Vidhyapith Chawk) दुमजली उड्डाणपूल तीन दिवसांत वाहतुकीसाठी खुला होणार असून, मंगळवारपर्यंत लोकार्पण होईल, असे पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शनिवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार औपचारिक सोहळा न करता जनतेसाठी सुरू केला जाईल.(Pune News)
वाहतूक कोंडी सुटणार
या पुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळेल. पीएमआरडीएची घरे वाटप, ड्रेनेज आणि नद्या स्वच्छता प्रकल्पही वेगाने मार्गी लागत आहेत. मार्चअखेर १०,००० घरांचे वाटप पूर्ण होईल, तर इंद्रायणी-पवना नद्यांसाठी कोट्यवधी कामे हाती आली .शहरी विकासाला गती
५७ गावांमध्ये १,२०० कोटींची ड्रेनेज प्रणाली, मुळा-मुठा नदी (MUla Muttha River) स्वच्छतेसाठी ९०० कोटींच्या निविदा लवकरच.(Pune News) पुणे परिसरातील विकासकामे निर्णायक टप्प्यात असल्याचे म्हसे यांनी सांगितले
