Pune Crime : खूप पैसे मिळतील’ आमिष दाखवून अल्पवयीनला लॉजमध्ये घेऊन गेला …अन् पुढे घडलं वेगळंच…समोर

पुणे -प्रतिनिधी

अनैतिक मानवी वाहतूक विरोधात गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे-सातारा रस्त्यावरील साई लॉजवर (Sai Loadge)छापा टाकला. पैशाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघड होत तीन जणांना अटक केली. (Pune Crime)

अटक केलेल्यांमध्ये वर्षा शंकर शिरसाठी (Shankar Shirsathi )(३५, विजयनगर, चिंचवड), अनिल मदन जेधे (Anil Jedhe) (३५, साने चौक, चिंचवड) व जीवन प्रमोद इंगोले (Jeevan Inagale )(३३, साई लॉज) यांचा समावेश आहे. सहकारनगर पोलीसांत मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा व पोक्सो (Pocso) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. गुप्त माहितीवर सापळा रचून छापा टाकला असता मुलगी संशयितांच्या ताब्यात आढळली.

चौकशीत आमिष दाखवून व्यवसायात ढकलल्याचा प्रकार समोर आला. मुलीला समुपदेशन व मदत दिली जात आहे, रॅकेटचा तपास सुरू आहे. पोलिसांनी लॉज-हॉटेल्सवरील (lodge hotels) देखरेख वाढवली असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *